Call us now:
आमच्याबद्दल
महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती, महाराष्ट्र राज्य हि संघटना समाजातील विविध घटकांवरती काम करणारी व बहुजन समाजाला त्यांच्या हक्कांचा न्याय मिळवून देणारी संघटना आहे.
बहुजनांसाठी न्याय
शेतकरी, कामगार, महिला, शिक्षण व आरोग्यासाठी लढणारी संघटना. हक्कांचे रक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सतत कार्यरत.
युवकांचा सहभाग
तरुण पिढीला एकत्र करून प्रश्नांवर ठाम आवाज. सामाजिक-सामूहिक कामातून परिवर्तन साधण्याचा प्रयत्न.
महाराष्ट्रासाठी संघटन
फलटण येथून सुरू झालेली राज्यव्यापी चळवळ. सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत.
बहुजनांचा हक्क, स्वाभिमानाची चळवळ
महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती, महाराष्ट्र राज्य हि संघटना समाजातील विविध घटकांवरती काम करणारी व बहुजन समाजाला त्यांच्या हक्कांचा न्याय मिळवून देणारी संघटना आहे. भारतीय समाजात शेतकरी, शेतमजूर, कामगार, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व सहकार हे मुख्य घटक आहेत.
ज्यामध्ये सर्व सामान्य लोकांना दैनंदिन जीवनामध्ये काम करीत असताना सामाजिक व आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो व समाजातील अनेक हक्कांच्या मुलभूत घटकांपासून वंचित राहाव लागत व अखेर त्यांची कामे होत नाहीत.
तसेच समाजातील विविध लोकांची व समुहाची कामे मार्गी लागावीत म्हणून स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना समाजातील तरुण-तरुणी, युवक-युवतींना एकत्रीत घेवून त्यांचा आर्थिक व सामाजिक अडीअडचणी व समस्यांवर आवाज उठवण्याचे काम करते व त्यांचे मुलभूत हक्कांचे संरक्षण करून सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत करते.
महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती ही महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांनी एकत्रित येऊन सर्व सामान्य लोकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे व त्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत घोरपडे यांना केले असून त्याचे कार्यालय हे फलटण या ठिकाणी स्थित आहे.

उद्देश
जनसेवा हीच राष्ट्रसेवा
महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच तरूण-तरुणी, युवक – युवतींना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्यावरती आवाज उठवणे व त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करून देणे व त्यांची आर्थिक व सामाजिक जीवनाची परिस्थिती सुधारणे हा आहे.
समाजातील व्यक्ती, गट व समुदायाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या बेरोजगारी, गरिबी, अशिक्षित, जातिभेद, लिंगभेद, बालमजुरी, भ्रष्ट्राचार व पर्यावरण प्रदूषण या सारख्या सामाजिक व नैसर्गिक समस्यां वरती आवाज उठविणे हा आहे.

उद्दिष्ट्ये
राष्ट्र असो वा महाराष्ट्र, महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्तीच्या नेतृत्वात शिवशाहीचा आसमंत बहरतो आहे
भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक या सारख्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे व समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार व तसेच शोषणा विरुद्ध आवाज उठविणे.
बेरोजगार युवक-युवती, तरुण-तरुणीला रोजगार उपलब्ध करून देण्यात मदत करणे व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होण्याकरीता मदत करणे.
अध्यक्षांचे मनोगत
या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी संघटनेतील संबंधित सर्व कार्यरत असलेल्या विभागीय प्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, व गाव सदस्य प्रमुख व इतर पदाधिकारी यांचे स्वागत,अभिनंदन व कौतुक करतो. ज्यांच्या प्रेरणेतून आपल्या संघटनेची उभारणी झाली अशा थोर महान व आदर्शवादी अवघ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्रातील सर्व समाज परिवर्तकांना अभिवादन करतो.
या संघटनेमध्ये प्रवास करीत असताना संघटनेची उद्देश समोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
समाज परिवर्तन करीत असताना कोणतीही लढाई ही संघर्षाशिवाय होत नाही. आपली संघटनेची वाटचाल ही अशीच आहे. मला अभिमान वाटत आहे की आपल्या संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हे शेतकरी, शेतमजूर,कृषी ,कामगार,आरोग्य,शिक्षण ,सहकार ,महिला या घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वोपरि प्रयत्नशील आहेत. मला विश्वास आहे की, आपली संघटना भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वतंत्र्य,सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक स्वतंत्र यासारख्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करून वंचित, बेरोजगार, भ्रष्टाचार, बाल मजुरी, पर्यावरण प्रदूषण विरुद्ध आवाज उठवणे व गोर-गरिब लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत राहील. त्यासाठी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आव्हान करतो की संघटनेमध्ये सहभागी व्हावे. तरी सर्व पदाधिकारी व सदस्य यांना मी शुभेच्छा देतो.
धन्यवाद
डॉ. अभिजीत घोरपडे
अध्यक्ष – महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती, महाराष्ट्र राज्य

आमचा कार्यकारी संघ
आपल्या पक्षाचा पाया म्हणजे हे प्रमुख सदस्य. त्यांची मेहनत, अनुभव आणि निष्ठा आपल्या ध्येयांनाच दिशा देतात. खाली तुम्हाला आमच्या प्रमुख सदस्यांची नावे आणि त्यांचे फोटो पाहायला मिळतील.
Eugene Grand
Partner
Danielle Carrol
Partner
George Jordan
Partner
Mike Clarks
Partner
Vanesa Williams
Partner
Teo Calias
Partner