स्वाभिमानी जनशक्ती संघटनेतर्फे शेतमजूरांना त्यांचा न्याय हक्कांसाठी मदत केली जाते. ज्यामध्ये शेतमजुरांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, त्यांना एकत्रीत आणून त्यांचे संघटन करणे, त्यांच्या समस्यांवर आवाज उठवणे आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणे यासाठी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य कायम कार्यरत असतात. शेतमजुरांना त्यांचे हक्क, विशेषतः कामगार कायदे आणि त्यांच्या कामाच्या बदलांविषयी माहिती देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यास मदत केली जाते. शेतमजुरांना एकत्रीत आणून त्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी मदत केली जाते आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व मजबूत बनविले जाते.
शेतमजुरांच्या आर्थिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मदत केली जाते, जसे की त्यांच्यासाठी कर्ज योजना, बचत गट, आणि व्यवसाय वृद्धी वाढीसाठी सहकार्य केले जाते.