शेतकरी

शेतकऱ्यांच्या अडी-अडचणीमध्ये कायम पाठीशी उभी राहणारी
संघटना म्हणजेच महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती.

आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. परंतु अफाट लोकसंख्या वाढीमुळे व औदयोगिकरणामुळे लागवडीखालील शेतीचे क्षेत्र उत्तरोत्तर कमी होत गेले आणि पर्यायाने उत्पादन सुध्दा कमी झाले. अन्नदाता असूनदेखील शेतकरी स्वतः मात्र आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आणि सततच्या आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनबरोबर समाजांतील इतर घटकांनीसुध्दा प्रयत्न केले पाहिजेत, हे लक्षात घेऊन व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी

शेतकरी आमचा विठ्ठल शेतकरी आमचा भगवंत

व्यथित होऊन शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्याचा स्वाभिमानी संघटनेने निश्चय केला आहे व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल या विचांरावर महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती कार्यरत आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवलंबले पाहिजे आणि शेतकरी राजाला दर्जेदार कृषी निविष्ठांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन केले जावे म्हणून स्वाभिमानी जनशक्ती सदैव कार्यरत आहे.

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.