शिक्षण

सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण, शाळा सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा.

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी संघटनेमार्फत प्रामाणिक प्रयत्न केले जातात, उच्च शिक्षण सर्वांसाठी सुलभ व्हावे यासाठी सर्व समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेतील पदाधिकारी प्रयत्नशील असतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क सामान्य विद्यार्थ्यांना परवडेल असे नियंत्रण ठेवून संबंधित संस्थांवर पदाधिकारी संघटनेमार्फत विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य प्रकारे राबविण्यासाठी आमचे पदाधिकारी नेहमी विद्यार्थ्यांना मदत करीत असतात.
शैक्षणिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार शासनाकडून नवीन वस्तीग्रहाची मागणी केली जाते व त्या संदर्भात पाठपुरवठा देखील केला जातो. तसेच विद्यार्थ्यांना आपत्कालीन सुरक्षेतेचे व्यवस्थापन शिक्षण

आपले फक्त एकच कर्तव्य शिक्षित करूया समाज सर्व

देण्यासाठी संघटनेतील पदाधिकारी कार्यरत असतात. चाचन संस्कृत्ती वाढविण्यासाठी व भिलारच्या धर्तीवर प्रत्येक गावात, तालुक्यात, विभागात एक पुस्तकाचे गाव उभे करण्यासाठी व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेतील पदाधिकारी कार्यरत आहेत.

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.