महिला

महिलांसाठी सुरक्षा, स्वावलंबन योजना आणि नेतृत्वासाठी नवी संधी.

भारतीय संविधाने समान भागीदारी दिलेल्या महिलांच्या सन्मानासाठी संघटनेतील पदाधिकारी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने प्रयत्नशील राहतात. माझी कन्या भाग्यश्री योजना, अस्मिता, महिला बचत गट यांच्या माध्यमातून महिलांना एकत्रित कामे करण्यासाठी व देश हितासाठी संघटनेतील पदाधिकारी महिलांना प्रोत्साहन देतात.

महिला अत्याचार, अॅसिड पिढीताना मिळणाऱ्या मदतीची व सुरक्षितेसाठी लक्षणीय पुढाकार संघटनेतील पदाधिकारी घेत असतात.

महिला उद्योजक, महिला शेतकरी, महिला बचत गटांना शासनाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी आमचे पदाधिकारी कार्यरत आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना महिलांसाठी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रकारे योगदान देऊन महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, उद्योजकता प्रोत्साहन, आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे यांसारख्या क्षेत्रात काम करून महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती संघटना महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी काम करीत आहेत.

स्त्री जन्म म्हणजे, एक स्वाभिमान एक आत्मसन्मान

महिलांना समान सन्मानाची वागणूक देण्यासाठी स्त्री-पुरुष समानता हा विषय हाती घेऊन संघटनेतील पदाधिकारी समाजात प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत.

महिला आयोग महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर उपाययोजना करण्यासाठी काम करीत आहे व महिलांसाठी कायदेशीर सल्ला, समुपदेशन आणि साक्षरता कार्यक्रम आयोजित केले जातात व महिलांवरील अत्याचार होवू नयेत म्हणून आमच्या स्वाभिमानी जनशक्ती संघटनेमार्फत महिलांना मदत केली जाते व महिलांवरील अत्याचार केलेला नराधमास माहिला आयोगामार्फत पाठपुरावा करुन संबंधितावर कारवाई होई पर्यंत आमचे पदाधिकारी पाठपुरावा करीत असतात.

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.