स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना कृषी क्षेत्रात अन्नसुरक्षा वाढविण्यासाठी, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी, अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, जलस्रोत सुधारण्यासाठी, वृक्ष लागवड करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी, वनीकरण व मत्स्यपालन वाढविण्यासाठी तसेच शेतकरी व शेतमजूर बांधवांना त्यांच्या उत्पादनत वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करते.
स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची खरेदी आणि विक्री संदर्भात व खर्च कमी करण्याबाबत बाजारपेठेशी संपर्क साधन्यात मदत करते व शेतकऱ्यांना नव-नवीन विकसीत पिक पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जनजागृती करते.