कामगार

कामगार हक्क, सुरक्षित कामाचे ठिकाण आणि किमान वेतन हमी.

स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना कामगारांना त्यांच्या हाक्कांचे संरक्षण करण्यासाठी, कामासंदर्भात जाचक अटीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि चांगले वेतन मिळावे हयासाठी प्रयत्न करते व तसेच कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवण्यास मदत करते व कामगारावर होणारे अन्याय, गैरव्यवहार किंवा कामाच्या ठिकाणी गैरवापर होत असेल तर त्याविरोधात लढण्यास मदत करते व कामगारांच्या कामाच्या अटी सुधारण्यासाठी प्रयत्न करते, ज्यामध्ये कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, कामाचे स्वरूप आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी मदत केली जाते.

स्वाभिमानी जनशक्ती संघटना कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहते. तसेच निवृत्ती

कार्यभार वाहू श्रम सेवेशी लावू कर्म करत देश सेवेसी राहू

वेतन, आरोग्य विमा आणि इतर सुविधा मिळवून देण्यासाठी मदत करते व कामगारांच्या वतीने मालकांशी भेटून कामगारांविषयी असणाऱ्या अडी-अडचणीबद्दल चर्चा करते तसेच आरोग्य विमा, अपघात विमा, कामगारांचे लसीकरण याबद्दल माहिती देवून कामगारांना मदत करते व त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि कायद्यांविषयी माहिती मिळवून देण्यात मदत करते.

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.