आरोग्य

सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण, शाळा सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा.

प्रत्येक मानवी मनुष्याला जास्तीत-जास्त उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभावे असे स्वाभिमानी जनशक्ती संघटना इच्छिते, त्यासाठी आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी व आरोग्य सुधारण्यासाठी शासनाकडून रोग प्रतिबंधक उपाय विशेषः ता संसर्गजन्य व साथींच्या रोगाचा प्रतिबंध थांबवण्यासाठी जनजागृती करते व तसेच जागतिक शांतता व सुरक्षितता वाढविण्यासाठी उपाय योजनांची लोकांना माहिती देते.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांची प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना इत्यादीतून राज्यातील गरजूंना आरोग्य विम्याचा कवच प्राप्त करून देण्यासाठी व योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करते.

जगात श्रीमंतीचे धन म्हणजे आरोग्य

स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना शासनातर्फे गरजूंना मोफत औषधोत्पचार तसेच आरोग्य विषयी योग अभ्यास बद्दल मार्गदर्शन करण्यास मदत करते तसेच लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आवश्यक लसीकरण व औषधे, गर्भवती महिलांना योग्य वेळेत तपासणी करण्याकरिता जनजागृती निर्माण करण्यास मदत करते.

स्वाभिमानी जनशक्ती संघटना ही गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या सुविधा मिळण्यासाठी व लहान मुलांसाठी लसीकरण करण्यासाठी शिबीरांमार्फत मार्गदर्शन करते व तसेच रक्त चाचण्या, कर्करोग तपासणी, मधुमेह आणि उच्च रक्तदाब चाचण्या विषयी जनजागृती निर्माण करण्यात मदत करते.

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.