सहकार

सहकारी संस्थांची मजबुती, पारदर्शकता आणि स्थानिक नेतृत्वाचा विकास.

सहकारी संस्था ही मुळात समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेली असते.

महाराष्ट्रात विविध सहकारी संस्था कार्यरत आहे ज्यामध्ये पतपुरवठा सहकारी संस्था, खरेदी-विक्री संस्था, शेतीमाल प्रक्रिया संस्था, ग्राहक सहकारी संस्था अशा अनेक सहकारी संस्था सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत व या संस्थेमार्फत सर्व सामान्य लोकांची कामे केली जातात परंतु ज्ञानाचा अभाव किंवा माहिती नसल्यामुळे सर्व सामान्य लोकांची कामे रखडलेली जातात म्हणून आमच्या संघटनेमार्फत जनतेची कामे व्हावीत म्हणून सहकारी संस्थेशी बोलून विचार विनिमय करून सर्व सामान्य लोकांची कामे पार पाडली जातात.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ महकार एक सार आनंदाचे तत्व राखीतो फार

ग्रामीण भागातील सावकार आणि खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा व शेतमालाच्या किंमतीतील व उत्पादनातील चढ उताराचा गैरफायदा घेवू नये त्यासाठी शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सहकारी तत्वावर कर्ज पुरवठा व विपणन संस्था कडून शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मदत केली जाते आणि खाजगी व्यापारी, जमीनदार, सावकार यांची मक्तेदारी प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकारी पतसंस्था, सहकारी खरेदी-विक्री संस्था, विपणन संस्था यांच्या द्वारे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी कायम कार्यरत असतात.

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.